सुरक्षा रक्षकांचे आंदोलन सुरू

0
91

गेल्या डिसेंबरमध्ये सरकारने रोजगार भरती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना सेवेत घेण्याचे आश्‍वासन दिले होते. सरकारने याबाबतीत विश्‍वासघात केल्याच्या निषेधार्थ बेरोजगार बनलेल्या सुरक्षा रक्षकांनी कालपासून येथील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा मार्गही खुला ठेवल्याचे कामगार नेते अजितसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने विश्‍वासघात केल्यामुळेच वरील निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले. आझाद मैदानावर निदर्शने चालू असतानाच राज्यातील चाळीसही मतदारसंघात जाऊन जाहीर सभा व पथनाट्याच्या माध्यमांद्वारे अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली.