इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज असलेल्या गुगल कंपनीविरोधात सीबीआयने एका प्रकरणी प्राथि’क चौकशी नोंद केली आहे. केंद्रीय गृह’ंत्रालयाखालील भारतीय सर्वेक्षक सरसंचालकांच्या कार्यालयातर्फे गुगल विरोधात नोंदविलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सीबीआयने प्राथमिक चौकशी करण्याचे ठरविले आहे. अमेरिकेतील वरील कंपनीने मॅपाथॉन २०१३ च्या आयोजना संदर्भात त्यांच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार करण्यात आली आहे.
कायद्याने प्रतिबंधीत असलेल्या संवेदनशील तसेच संरक्षणविषयक क्षेत्रासंदर्भात कायद्यांचे उल्लंघन वरील मॅपाथॉनमधून करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

