23 C
Panjim
Thursday, December 3, 2020

सीएए’चा कुठल्याच नागरिकाला धोका नाही

>> सरसंघचालक मोहन भागवत यांचे दसरा मेळाव्यात प्रतिपादन

सीएएचा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही. सीएएविरोधी देशात निदर्शने झाली. निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे देशात तणाव निर्माण झाला. पण सीएएचा देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही. सीएएवर अधिक चर्चा होण्यापूर्वी, यावर्षी देशावर कोरोनाचे संकट आल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल सांगितले.
ते संघाच्या विजयादशमी सोहळ्यात बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव काल रविवारी नागपुरात पार पडला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या सोहळ्याला कवायती नव्हत्या. तसेच यावेळी फक्त ५० स्वयंसेवकांचा सहभाग होता. सरसंघचालक भागवत यांनी हेडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केले. त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली.

चीनपेक्षा शक्तिशाली होण्याची गरज
पुढे बोलताना श्री. भागवत म्हणाले की, कोरोना काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. चीनचा विस्तारवाद लक्षात घेता तो पुढे काय करेल माहिती नाही. त्यामुळे भारताला चीनपेक्षा आधिक शक्तिशाली होण्याची गरज असल्याचे भागवत म्हणाले. यंदा संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. या काळात संपूर्ण देश एक झाला. सर्वांनी मिळून करोनासोबत लढा दिला आहे. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आले. शिवाय ९ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. हे निर्णय देशाने संयमाने स्वीकारल्याचे भागवत म्हणाले.

सरकार पाडून दाखवा : ठाकरे

मी ज्यावेळी मुख्यमंत्रिपदी बसून कारभाराला सुरुवात केली, त्या दिवसापासून अनेकजण हे सरकार पडेल म्हणून स्वप्न बघत आहेत. तेव्हा दिल तसेच आजही मी आव्हान देतोय की, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे खुले आव्हान पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपला दिले. दसर्‍या मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते. घंटा वाजवा, थाळ्या बडवा हेच तुमचे हिंदुत्व आहे का? असाही सवाल त्यांनी केला.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

शाळा सुरू करताना…

विलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड

शशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...

दुरपती

पौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...

कार्तिकातला दीपराग

मीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...

ALSO IN THIS SECTION

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

कोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा

>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...

नोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...

आंदोलक शेतकर्‍यांनी फेटाळला अमित शहांचा चर्चेचा प्रस्ताव

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकर्‍यांचे काल चौथ्या दिवशीही दिल्ली सीमेवर आंदोलन सुरू होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

पेडण्यात ३५ लाखांचे अमली पदार्थ जप्त

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने शनिवारी मध्यरात्री पेडणे तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकत अमली पदार्थ विक्रीमध्ये गुंतलेल्या ३ जणांना अटक केली. यावेळी...