सिली सोल्स प्रकरण आता मुख्य सचिवांसमोर

0
5

आसगाव-बार्देश येथील सिली सोल्स रेस्टॉरंट अँड बार प्रकरणी अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी दिलेल्या आदेशाला आयरिश रॉड्रिगीस यांनी मुख्य सचिवांसमोर आव्हान दिले आहे. आयरिश रॉड्रिगीस यांनी आव्हान याचिकेत ३३ मुद्दे उपस्थित करून त्या आदेशाला आव्हान दिले आहे. अबकारी आयुक्तांनी १० ऑक्टोबर रोजी त्यांच्या आदेशात सिली सोल्स बारच्या उत्पादन शुल्क परवान्यास परवानगी दिली होती. मृत व्यक्तीच्या नावाने असलेल्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याचा आरोप रॉड्रिगीस यांनी केला होता.