Home बातम्या सिरीयाची यूनोकडे याचना

सिरीयाची यूनोकडे याचना

0

आपल्या देशात संभावित लष्करी हस्तक्षेप रोखावा अशी विनंती काल सिरीयाने काल संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली. आपल्याविरुद्ध लष्करी हल्ला म्हणजे अल् कायदाला समर्थन असल्याचे सिरीयाचे म्हणणे आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कालही अमेरिकी प्रतिनिधीगृहाकडून हल्ल्यासाठी समर्थन मिळविण्याकरिता लॉबिंगच्या कामात व्यस्त होते.

सिरीयात निर्माण झालेल्या प्रश्‍नाला शांतीच्या मार्गाने उपाय काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही यूनोला केली आहे.

सिरीयातील असद सरकारने दमासकस येथे रासायनिक शस्त्रांचा वापर केला असून त्यात १४२९ जण मृत्युमुखी पडल्याचा दावा अमेरिकेने केला असून लष्करी हस्तक्षेपाची तयारी चालविली आहे.

इराण, पाकिस्तानची चर्चा

दरम्यान, सिरीयातील घडामोडींबाबत काल इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ आणि पाकिस्तान पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझिज यांनी दूरध्वनीवरून बातचित केली.

इस्लामी जगतात चालू असलेल्या नवीन घडामोडींबाबतही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींत बोलणी झाली.

इराणच्या पराराष्ट्र मंत्र्यांनी रासायनिक शस्त्रांच्या वापराची निंदा केली मात्र या परिस्थितीवर धोरणात्मक पद्धतीनेच तोडगा काढता येईल, असेही दोन्ही प्रतिनिधींनी मत व्यक्त केले. लष्करी हस्तक्षेप स्थिती बिघडवेल असे दोन्ही देशांचे आहे.