सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना सभापतींकडून आमदारपदाची शपथ

0
218

पणजी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांना काल पर्वरी येथील विधानसभा संकुलातील सभापतींच्या चेंबरमध्ये सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी आमदारकी व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कुंकळ्येकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या साध्या सोहळ्यास वनमंत्री एलिना साल्ढाणा, मच्छिमारी मंत्री आवेर्तन फुर्तादो, उपसभापती अनंत शेट, आमदार ग्लेन टिकलो, आमदार राजन नाईक, कार्लोस आल्मेदा यांच्यासह पणजीचे नगरसेवक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.