सिद्धरामय्या आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

0
3

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज (शनिवार दि. 20 मे) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपदाची आणि अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधीला देशभरातील अनेक नेत्यांना आमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, एनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनाही आमंत्रण पाठवले आहे. त्यामुळे विरोधकांचे शक्तिप्रदर्शन घडवण्याचा प्रयत्न आहे.