कमकुवत घटकांसाठी योजना जाहीर
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्दरामैय्या यांचा काल शपथविधी झाला. ६४ वर्षीय मागासवर्गीयांचे नेते सिद्धारामय्या यांना राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी भरगच्च कांतीरवा मैदानातील कार्यक्रमात पद व गोपनियतेची शपथ दिली. सङ्गेद शुभ्र धोती व शर्ट परिधान केलेल्या व स्वताला निरीश्वरवादी मानणार्या सिद्धारामय्या यांनी सत्यास स्मरून शपथ घेतली. काल त्यांचा एकट्याचाच शपथविधी झाला.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गरीब, अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांकरिता विविधप्रकारचे रु. ४,४०९.८१ कोटींचे लाभ जाहीर केले.
जूनपासून दारिद्र रेषेखालील ९८.१७ लाख लोकांना ३० किलो तांदुळ रु.१ प्रति किलो दराने दिले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दूध उत्पादकांचे अनुदान रु. २ वरून रु.४ प्रति लिटर करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागात गरिबांना गृहबांधणीसाठीचे अनुदान रु. ७५ हजारवरून रु. १.२ लाख करण्याचेही त्यांनी जाहीर केले. सरकारी महामंडळांमार्ङ्गत दिलेल्या कर्जावर कर्जमाङ्गी योजनाही त्यांनी अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास वर्गीयांसाठी जाहीर केली. शुक्रवारी काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चेसाठी ते आज दिल्लीला जाणार आहेत.