Home बातम्या सासष्टी, मुरगाव, तिसवाडी बार्देशच्या आराखड्यांस मान्यता

सासष्टी, मुरगाव, तिसवाडी बार्देशच्या आराखड्यांस मान्यता

0

आराखडे अधिसूचित करण्यापूर्वी ते जनतेसाठी ३० दिवस खुले ठेवण्याची मागणी गोवा बचाव अभियानने केली होती. परंतु सरकारने ती फेटाळून लावली. यापूर्वी सात तालुक्याचे आराखडे अधिसूचित केले आहेत.

किनारी भागातील वरील आराखडे अधिसूचित करण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळेच विलंब झाला होता. काही राजकारण्यांचे समाधान करूनच आराखड्यांना रूप कसे द्यावे, हा अधिकार्‍यांसमोर प्रश्‍न होता.

भरती रेषेपासून २०० मिटरपर्यंत बांधकामास पुन्हा मनाई

किनारी भागांत भरती रेषेपासून २०० मीटर अंतरापर्यंत बांधकामास बंदी घालण्यात आली आहे. काही काळापूर्वी किनारपट्टी भागांत वरील अंतरात बांधकामास परवानगी देण्यात आली होती.

पर्वरी, जुने गोवे आदींना बाह्य विकास आराखड्यातून वगळले

नगरनियोजन मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत किनारी भागांतील आराखड्यांना मान्यता देण्याबरोबरच बार्देशमधील पर्वरी, तिसवाडीतील जुने गोवे व करमळी तर मुरगावमधील वेळसाव पाळी या गावांना बाह्य विकास आराखड्यात समाविष्ट केले जाणार नसून या गावांचा पंचायत दर्जा कायम ठेवण्यात येणार आहे. या गावांना बाह्य विकास आराखड्यात समाविष्ट करण्याचा विचार होता.