सासष्टीत भाजप बळकट करणार : आलेक्स सिक्वेरा

0
4

सासष्टीमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी काम करणार आहे. सासष्टी तालुका हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे असे आता गृहीत धरले जाऊ शकत नाही. सासष्टीमध्ये भाजपचे मतदार सुध्दा आहेत, असे राज्य मंत्रिमंडळातील नवे मंत्री आणि नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल म्हटले आहे.

सासष्टी तालुक्यामध्ये भाजपच्या विचारसरणी मानणारे आणि भाजपला मतदान करणारे मतदार आहेत. या तालुक्यातील नावेली मतदारसंघ हे उत्तम उदाहरण आहे. सासष्टीतील मतदार आगामी काळात भाजपला नक्कीच बहुमत देतील, असा विश्वास मंत्री सिक्वेरा यांनी व्यक्त केला. एकंदरपणे दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपची स्थिती उत्तम आहे, असेही सिक्वेरा यांनी सांगितले. सासष्टीमध्ये भाजप विस्तारण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे. सासष्टीतील जनता नक्कीच भाजपला बहुमत देतील, असेही सिक्वेरा म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खात्याबाबत अजूनपर्यंत काहीच सांगितलेले नाही. मुख्यमंत्र्याकडून दिली जाणारी जबाबदारी आपण स्वीकारेन, असेही सिक्वेरा म्हणाले.