29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

सावरकरांना विरोध का?

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचे वचन भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले काय, त्यावर देशव्यापी वादाचे मोहोळ उठलेे आहे. सावरकरांचे नुसते नाव घेतले की आज वादाला सुरूवात होते हे दुर्दैव आहे. ‘कीं घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने’ म्हणत या देशाच्या स्वातंत्र्यासाठी निःस्पृहपणे लढलेल्या आणि त्यासाठी प्रचंड किंमत मोजलेल्या सावरकरांच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव ‘भारतरत्न’ ने झाला काय, किंवा न झाला काय, त्यांनी देशासाठी केलेला त्याग आणि समर्पण, सोसलेला छळ आणि यातना याचे मोल यत्किंचितही कमी होणार नाही, परंतु या विवादाच्या निमित्ताने काही घटकांच्या कोत्या, संकुचित आणि स्वार्थी मनोवृत्तीचे दर्शन मात्र देशाला घडेल. यापूर्वीही स्वतःला विचारवंत म्हणवणार्‍या मणिशंकर अय्यर नावाच्या एका मस्तवाल नेत्याने सेल्युलर जेलमधील सावरकरांच्या नावाची पाटी काढून टाकण्याचा हिडीस प्रकार केला होता. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास केवळ गांधी आणि नेहरूंपुरताच सीमित ठेवण्याचे षड्‌यंत्र सत्तर वर्षे चालले. सावरकरांपासून भगतसिंगांपर्यंत आणि नेताजींपासून अन्य अगणित क्रांतिकारकांपर्यंत या लढ्याचे श्रेय कधी पोहोचूच दिले गेले नाही. भले काहींचे मार्ग वेगळे असतील, परंतु ध्येय तर एकच होते? ते होते या देशाचे स्वातंत्र्य. त्यांची देशभक्ती, त्यांचे देशाप्रतीचे प्रेम काही कमी प्रतीचे नव्हते. पण त्या झुंजार देशभक्तांचे राष्ट्रकार्य इतिहासाच्या पानांतून मोजक्या ओळींत आटोपण्यात आले वा पुस्तकाबाहेर ठेवण्यात आले. हा कावा कॉंग्रेसच्या पदराखालून शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये धुडगूस घालणार्‍या डाव्या विचारवंतांचा होता. आता इतिहासाची वस्तुनिष्ठ पुनर्मांडणी करायची झाली तरी भगवीकरणाची ओरड करायला हीच मंडळी आघाडीवर! स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढ्या हाच अर्धवट इतिहास शिकत मोठ्या झाल्या आणि देशभक्ती, त्याग, समर्पण या मूल्यांना वंचित राहिल्या. प्रस्तुत प्रकरणामध्ये सावरकरांना ‘भारतरत्न’ दिले जाऊ नये यासाठी पूर्वीच गाडली गेलेली जुनीपुराणी भुते उकरून काढण्याचा प्रयत्न आज चालला आहे. आरोप अर्थात जुनेच आहेत. ‘सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती’, ‘गांधीहत्येच्या कटात त्यांचा सहभाग होता’ वगैरे वगैरे आरोपांची राळ पुन्हा एकवार उडवून दिली गेली आहे. माफीनाम्याचे म्हणाल तर छत्रपती शिवरायांवरही प्रसंगी तहाची वेळ आलेली होती आणि दोन पावले पुढे जायचे असेल तर एक पाऊल मागे हटणे हाही रणनीतीचा भाग मानून शिवरायांनी निमूटपणे आपण पराक्रमाने कमावलेले सगळे किल्ले मोगलांच्या स्वाधीन केले होेते. परंतु आग्य्राहून सुटका होताच त्याच पराक्रमी शिवरायांनी ते एकेक करून पुन्हा जिंकून घेत स्वराज्याची उभारणीही केली! सावरकरांनी खरोखर माफी मागितली होती का, असेल तर त्यामागची कारणे काय होती, व्यूहरचना काय होती, परिस्थिती कोणती होती या सगळ्या आजूबाजूच्या संदर्भांसह त्या घटनेची मांडणी झाली पाहिजे. पन्नास वर्षांची शिक्षा झालेल्या आणि आजही दुर्गम असलेल्या अंदमानमध्ये पाठवणी झालेल्या, एकांतवासामध्ये ठेवल्या गेलेल्या, दिवसभर कोलू पिसण्यासारखी अघोरी शिक्षा झालेल्या या क्रांतिकारकाच्या मनात काय चालले होते त्याचा अंदाज आपण कसा बांधू शकतो? त्यामुळे बाकी सगळे संदर्भ सोडून अशा गोष्टींची भुते उकरणे हे न्यायोचित नाही. गांधीहत्येबाबतही तेच आहे. गांधी हत्याकटात तत्कालीन कॉंग्रेस सरकारने सावरकरांना गोवले, परंतु ते आरोप सिद्ध झाले नाहीत. गांधीहत्येच्या विषयावर विपुल साहित्य उपलब्ध आहे. न्यायालयीन प्रक्रियेत एखादा ठपका येणे, त्यातून पुढे मुक्तता होणे हा त्या प्रक्रियेचा भाग असतो. सावरकरांना त्यांच्या राष्ट्रकार्याचे श्रेय लाभू नये यासाठी काही घटक सातत्याने त्यांच्यावर दोषारोप करीत आले आहेत. आजही तेच चालले आहे. कॉंग्रेसने काल पत्रकार परिषद घेऊन सावरकरांना भारतरत्न दिले जाणार असेल तर देवा, तूच या देशाला वाचव! असे साकडे घातले. त्यांना अजूनही हे कळलेले नाही की ही सावरकरविरोधी भूमिका घेऊन कॉंग्रेसने स्वतःच महाराष्ट्रातील येत्या निवडणुकीतील आपल्या शवपेटीवर खिळा ठोकलेला आहे. भाजपच्या सापळ्यामध्ये कॉंग्रेस अलगद अडकली आहे, जशी ती गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बालाकोट हल्ल्याच्या विषयामध्ये सापळ्यात अडकली होती! सावरकरांविषयी भक्तिभाव जपणार्‍या मराठी माणसाला आज काय वाटत असेल याचा विचारही कॉंग्रेसच्या दिल्लीत बसून उंटावरून शेळ्या हाकणार्‍या नेत्यांच्या मनात आलेला दिसत नाही. एकेकाळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या कॉंग्रेसशी नाते सांगणार्‍या आजच्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाचे या देशाच्या राष्ट्रीयत्वाशी नातेच उरलेले नाही का असा प्रश्न त्यामुळे विचारला गेला तर नवल नाही. संघपरिवार आज सावरकरांचा वारसा सांगत असला तरी सावरकरांच्या हयायीत काही त्यांचे त्यांच्याशी फार सख्य नव्हते. ‘गाय हा उपयुक्त पशू’ संबोधणारे विज्ञानवादी सावरकर हिंदुत्ववाद्यांच्याही पचनी पडणारे नव्हते. आज सावरकरांचा उदोउदो चालला आहे तो मतांसाठी. विरोधात पुढे आलेल्यांना हेच उमगलेले नसेल तर कीव करावी तेवढी थोडीच!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

युवराज राजी

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा पुढील वर्षीच्या संघटनात्मक निवडणुकांनंतर स्वीकारण्यास राहुल गांधी एकदाचे राजी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या कॉंग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक...

भाजपमध्ये नवा जोश

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताज्या गोवा भेटीने केले आहे. गेले काही...

मगोचे तळ्यात मळ्यात

राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो व सत्तेसाठी वाट्टेल तशा तडजोडी करता येतात हेच शेवटी खरे असते असे आम्ही मगो...

‘भूमिपूत्र’ बारगळले

विविध घटकांकडून टीकेचा भडीमार झाल्यानंतर पस्तावलेल्या सरकारच्या वतीने पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल वादग्रस्त गोवा भूमिपूत्र अधिकारिणी विधेयक २०२१ कार्यवाहीत न आणता...