साळ येथे आजमराठी निर्धार मेळावा

0
4

साळ येथे 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता मराठी राजभाषा निर्धार समिती – साळ यांच्या वतीने विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा ग्रामपंचायत सभागृह, साळ येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुभाष वेलिंगकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या सभेमध्ये मराठी भाषेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात ठोस भूमिका घेण्यावर भर दिला जाणार आहे. मराठी भाषेच्या माध्यमातून पिढ्यान्‌‍ पिढ्या संस्कारक्षम समाज घडला असून त्या भाषेचा होणारा अपमान सहन केला जाणार नाही, असा निर्धार या बैठकीत व्यक्त केला जाणार आहे. तसेच, भविष्यात मराठी भाषेचा अपमान होऊ नये यासाठी जागरूक राहून मराठीच्या सन्मानासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. गोव्यात अभिजात मराठी भाषेला दुसऱ्या राजभाषेचा दर्जा मिळावा, यासाठी या सभेत चर्चा होणार आहे. साळ व पंचक्रोशीतील मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या निर्धार सभेला सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.