साळावली धरणातील मँगनिज स्पष्ट होणार

0
57

साळावली जलशयातील पाण्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यात खरोखरच मँगनिजचे प्रमाण वाढल्याचे दिसून आल्यास जलशुद्धीकरण काम सुरू केले जाईल, असे जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते संदीप नाडकर्णी यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रश्‍नावर पुढील दोन दिवसांत तोडगा काढणार असल्याचे सांगितले.

पाण्याच्या नमुन्याची तपासणी करून अहवाल उपलब्ध करण्यासाठी २४ तासा लागतील, असे ते म्हणाले.

बांधकाम खात्याला वरील जलाशयात मँगनिज प्रमाण वाढल्याचे दिसून आल्याने सरकारसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या पाऊसही पडत नाही व खाण व्यवसायही बंद आहे, असे असतानाही पाण्यातील मँगनिजचे प्रमाण कसे वाढू शकते असा प्रश्‍न निर्माण झाल्याचे नाडकर्णी यांचे म्हणणे आहे.