साळावली धरणाचे पाणी नोव्हेंबरपासून शेतीसाठी

0
9

साळावली धरणातील पाणी येत्या १५ नोव्हेंबरपासून शेतीच्या सिंचनासाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती काल जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. सिंचनासाठी धरणातील पाणी हे धरणाला जोडलेल्या कालव्यात सोडण्यात येणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. कालव्यांची आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर हे पाणी कालव्यात सोडण्यात येईल.

या पाण्याचा कुडचडे, काकोडा, केपे, बाळ्ळी आदी ठिकाणच्या शेतीला फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील ११० शेतकरी सोसायट्यांपैकी सध्या ५२ सोसायट्या कार्यरत आहेत. सर्व शेतकर्‍यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन या शेतकरी सोसायट्या पुनरुज्जीवित करण्यात येणार असल्याचेही शिरोडकर यांनी सांगितले.