साळमध्ये दारू आणण्यास पर्यटकांवर निर्बंध

0
68

साळ येथे उभारण्यात आलेल्या मिनी पूल वजा बंधार्‍याने पर्यटकांना भूरळ घातलेली असून शापोरा नदीच्या या रम्यपरिसरात येणारे पर्यटक दारू पिवून दंगामस्ती करत कचरा टाकून परिसर विद्रूप करत असल्याची दखल घेत हे सर्व प्रकार बंद करावेत, असा आक्रमक इशारा साळ पंचायतीने कालच्या बैठकीनंतर दिला.

साळचे सरपंच घन:श्याम राऊत तसेच सज्जन नाईक, गणेश राऊत, प्रदीप गावडे, शैलेश राऊत आदींच्या उपस्थितीत पंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत साळ येथे मौजमजा करणार्‍यांना दारू पिऊन धिंगाणा घालता येणार नाही.

त्यांनी निसर्गाचा आस्वाद जरूर घ्यावा. परंतु या पवित्र ठिकाणी दारू पिवू नये तसेच कचरा करू नये असा ठराव घेतला. याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस यंत्रणा व संबंधित यंत्रणेलाही कल्पना देण्यात आल्याचे सरपंच घन:श्याम राऊत यांनी सांगितले. पिकनिकला येणार्‍यांना आपला अजिबात विरोध नाही परंतु या भागाचे पावित्र्य बिघडवू नका, शिस्त राखा असे आवाहन घन:श्याम राऊत यांनी केले आहे.