27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध ः मुख्यमंत्री

>> मडगावचे ईएसआय इस्पितळ आजपासून पुन्हा सुरू

>> शुक्रवारी कोरोनाने ९२७ बाधित, सहाजणांचा मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर सभागृहे किंवा सभागृहाबाहेरील सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभांच्या आयोजनावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात येणार आहे. तसेच आज शनिवारपासून मडगाव येथील ईएसआय इस्पितळ पुन्हा सुरू केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

मडगावच ईएसआय इस्पितळात २१० खाटा आहेत. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणखी १५० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. बांबोळी येथील इस्पितळात अतिरिक्त ६० खाटा तातडीने उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच, गरज भासल्यास फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ कोविड रुग्णांसाठी उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याप्रमाणे गोवा राज्यातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने बाधित रुग्ण कधीच आढळून आले नव्हते. यापूर्वी जास्तीत जास्त ७५० च्या आसपास रुग्ण आढळून आले होते. राज्यातील बरेच कोरोना रुग्ण शेवटच्या क्षणी इस्पितळात येतात. कोरोनाची लक्षणे दिसून येताच नागरिकांनी इस्पितळात दाखल व्हावे. कोरोना रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा कमी पडू दिल्या जाणार नाहीत. उत्तर गोव्यात स्वॅब चाचणीसाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सावधगिरी बाळगण्याची गरज
नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभात मोठ्या संख्येने एकत्र येऊ नये. केवळ लॉकडाऊन करून काहीच साध्य होणार नाही. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सामाजिक अंतर, मास्क आदींचे पालन करावे. देवस्थानातील उत्सव कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करावेत. राज्यातील उद्योग आणि व्यावसायिकांनी एसओपीचे पालन करण्यावर भर द्यावा, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पर्यटकांत घट
राज्यात विमानांतून येणारे पर्यटक आणि रस्ता मार्गाने येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. नागरिकांनी पर्यटकांच्या संपर्कात येऊ नये. राज्यात कोरोना लसीकरण मोहीम २० एप्रिल २०२१ पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर आरोग्य केंद्रांवर कोरोना लस दिली जाईल. राज्यात कोरोना लशींचा आवश्यक साठा उपलब्ध आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सरकारी इस्पितळांबरोबर तीन-चार खासगी इस्पितळात कोविड उपचारांची सोय आहे. राज्यातील इस्पितळांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्लाझ्माची जास्त प्रमाणात गरज भासत आहे. त्यामुळे प्लाझ्मा दानासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

२४ तासांत १०० जण इस्पितळात
राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत सतत होत असून इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. चोवीस तासांत नव्या १०० रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मागील चार दिवसांत नवीन ४७२ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील सरकारी इस्पितळात कोविड रुग्ण विभागातील खाटा भरल्या आहेत. नवीन रुग्णांना दाखल करून घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मडगावात ७२५ तर पर्वरीत ५८९ रुग्ण
मडगावातील रुग्णवाढ कायम असून सध्याच्या रुग्णांची संख्येने सातशेचा टप्पा पार केला असून रूग्णसंख्या ७२५, तर पर्वरी परिसरात रुग्णसंख्या ५८९ झाली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने ६५ हजारांचा टप्पा पार केला असून एकूण रूग्णसंख्या ६५ हजार ४९९ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आणखी २८२ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ५८ हजार ३१० एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०२ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ३५७ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. चोवीस तासांत ३१८९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील २९.०७ टक्के नमुने बाधित आढळून आले आहेत. तर २० प्रवासी बाधित आढळून आले.

सहा जणांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एक दोन रुग्णांच्या निधनाची नोंद होत होती. आता, रुग्णांच्या बळींची संख्या वाढ आहे. चोवीस तासांत आणखी ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दोन रुग्णांचा इस्पितळात दाखल केल्यानंतर सहा तासांच्या आत मृत्यू झाला. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्ण, गिरी येथील ४८ वर्षीय महिला रुग्ण, बेळगाव येथील ५१ वर्षीय महिला रुग्ण, सिंधुदुर्ग येथील ६० वर्षीय पुरुष रुग्ण, ८० वर्षीय पुरुष रुग्ण आणि नोयरा येथील ४४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दैनंदिन अहवालात दिली आहे.

शुक्रवारी ९२७ बाधितांसह सहा मृत्यू
राज्यातील नव्या कोरोना रुग्णवाढीची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. चोवीस तासांत नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने आणखी नवीन उच्चांक गाठला असून नव्या रुग्णांची संख्या १ हजारांजवळ येऊन ठेपली आहे. राज्यात काल नवे ९२७ बाधित रुग्ण सापडले असून सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २९.०७ टक्क्यांवर पोहोचले असून सध्याच्या रुग्णांची संख्या ६ हजार ३२१ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ८६८ झाली आहे.

शुक्रवारी राज्यात एकूण
११,४७६ जणांना लस

राज्यात कोरोना लसीकरणासाठी मोहिमेत काल एकूण ११ हजार ४७६ जणांना लस देण्यात आली. आरोग्य खात्याच्या ग्रामपातळीवरील लसीकरण मोहिमेअंतर्गत २० पंचायत क्षेत्रांत आयोजित कोरोना लसीकरण शिबिरांतून ५३४२ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तर, सरकारी आणि खासगी इस्पितळांतून ५६५३ जणांना लस देण्यात आली आहे. यात पार्से पंचायत १९८, उगवे १२०, कळंगुट ५२१, सडये १४५, ताळगाव ७०२, थिवी ३००, वन म्हावळींगे १२५, कुडणे २५७, साल्वादोर द मुंद १४२, होंडा २९३, भिरोंडा २४१, बोरी ३२५, रूमडामळ ३८३, बार्से १६३, दाभाळ किर्लपाल ३२६, धारबांदोडा ११०, रिवण ३४०, श्रीस्थळ १७८, कवळे २३० आणि कासावली पंचायत क्षेत्रात २४३ जणांना लस देण्यात आली.

पर्यटकांना कोविड चाचणी
सक्तीची करा : महिला कॉंग्रेस

गोवा प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांनी एका शिष्टमंडळासह काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांना एक निवेदन सादर करून गोव्यात येणार्‍या पर्यटकांना व अन्यांना कोविड चाचणी सक्तीची करण्याची मागणी सदर निवेदनाद्वारे केली. हवाई मार्ग, रेल्वे मार्ग, जलमार्ग तसेच बसेस्‌मधून दर दिवशी हजारो पर्यटक व अन्य लोक विविध कामांनिमित्त गोव्यात येत असतात. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या लोकांना कोविड चाचणी सक्तीची करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...