Home बातम्या ‘सामाजिक सुरक्षे’साठी बँकेत हेलपाटे

‘सामाजिक सुरक्षे’साठी बँकेत हेलपाटे

0

मे महिन्याचे मानधन अद्याप नाही

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर बराच भार पडू लागला असून काही लाभार्थींना गेल्या मे महिन्याचे आर्थिक सहाय्य अद्याप मिळाले नसल्याने लाभार्थी बँकांमध्ये हेलपाटे मारीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्य सहकारी बँकेतर्फे ज्या लाभाथीर्र्ंना आर्थिक सहाय्य वितरित केले जात आहे त्या सुमारे ४१ हजार लाभाथीर्र्ंना अद्याप सहाय्य मिळालेले नाही. एकूण लाभार्थींची संख्या सुमारे १ लाख २० हजारांवर पोचली आहे. दरमहा खात्याकडे येणार्‍या नवीन अर्जांची संख्याही ३०० ते ४०० च्या आसपास असते. या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवर २४ कोटींचा भार पडतो. खात्याने बोगस लाभार्थींना तसेच मृत झालेल्या किती लाभार्थींच्या नावावर रक्कम जमा होते, याचे सर्वेक्षणही चालूच ठेवले आहे. दोन महिन्यापूर्वी सुमारे सहा कोटी रुपये बँकांतून परत आणणे खात्याला शक्य झाले. आणखी किमान दहा कोटी आणणे शक्य होईल, असे सांगण्यात येते.