सात उपअधीक्षकांच्या बदल्यांचा आदेश जारी

0
6

राज्य सरकारने सात पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्याचा आदेश काल जारी केला. प्रबोध शिरवईकर यांची दक्षिण गोवा वाहतूक उपअधीक्षक, सिद्धांत शिरोडकर यांची उत्तर गोवा वाहतूक उपअधीक्षक, सलीम शेख यांची एसडीपीओ वास्को, राजन निगळ्ये यांची एसीबी दक्षता उपअधीक्षक, राजेश कुमार यांची उपअधीक्षक पेडणे, रॉय परेरा यांची उपअधीक्षक जीआरपी, रुपेंद्र शेटगावकर यांची खास शाखा (उत्तर) उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच, पोलीस खात्याने ८ पोलीस उपअधीक्षकांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे.