सातवा वेतन आयोग लागू करा;अन्यथा संपावर : पंचायत कर्मचारी

0
10

राज्यातील पंचायत कर्मचारी अजूनही सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येत असलेला पगार घेत असून, येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात आला नाही, तर संपावर जाण्याचा निर्णय काल झालेल्या अखिल गोवा पंचायत कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

आयटकशी संलग्न असलेल्या अखिल गोवा पंचायत कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल पणजीत झाली. आयटकचे उपसरचिटणीस राजू मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ह्या आमसभेत वरील निर्णय घेण्यात आला.
यावेळी अखिल गोवा पंचायत कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारी समिती निवडण्यात आली. अध्यक्षपदी प्रदीप गावस यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी प्रीतम फडते व अनिल नाईक यांची निवड झाली. अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये सरचिटणीस : मोहन सामंत, संयुक्त सचिव : सुनिता मयेकर, कोषाध्यक्ष : संतोष नाईक तर सहाय्यक कोषाध्यक्ष म्हणून सरोज सीमेपुरूषकर यांची निवड करण्यात आली.