Home बातम्या साखळी व फोंडा पालिकांवर भाजप-मगोचे वर्चस्व

साखळी व फोंडा पालिकांवर भाजप-मगोचे वर्चस्व

0

कॉंग्रेसप्रणित विजयी नगरसेवकांत कुंदा माडकर, रश्मी देसाई, विभा देसाई, रियाज खान यांचा समावेश आहे. भाजपप्रणित नगरसेवकांत उपेंद्र कर्पे, नारायण रेळेकर, नीशा पोकळे, दयानंद बोर्येकर, दामोदर घाडी आणि दीक्षिता नाईक यांचा समावेश आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेले धर्मेश सलगानी यांनी माजी नगराध्यक्ष प्रवीण ब्लेगन यांचा पराभव केला.

साखळीतील विजयी उमेदवार

वॉर्ड १. कुंदा माडकर

वॉर्ड २. रश्मी देसाई

वॉर्ड ३ उपेंद्र कर्पे

वॉर्ड ४ धर्मेश सलगानी

वॉर्ड ५ विभा देसाई

वॉर्ड ६ नारायण रेळेकर

वॉर्ड ७ रियाज खान

वॉर्ड ८ नीशा पोकळे

वॉर्ड ९ दयानंद बोर्येकर

वॉर्ड १० दामोदर घाडी

वॉर्ड ११ दीक्षिता नाईक

फोंडा

फोंडा नगरपालिकेच्या १४ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत मगोप-भाजप युतीचे ११ नगरसेवक निवडून आले. फोंडा विकास समितीच्या पदरी घोर निराशा आली. प्रभाग ४ कडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रभागात माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचा पूत्र रॉय नाईक यांचा पराभव माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी केला. रॉय नाईक यांना ३१६ तर व्यंकटेश नाईक यांना ५८५ मते मिळाली.

फोंडा पालिकेतील विजयी उमेदवार

वॉर्ड १ सीतारा डांगी

वॉर्ड २ गीताली तळावलीकर

वॉर्ड ३ आरवीन सुवारीस

वॉर्ड ४ व्यंकटेश नाईक

वॉर्ड ५ लालन नाईक

वॉर्ड ६ सुनील देसाई

वॉर्ड ७ विश्‍वनाथ दळवी

वॉर्ड ८ शांती नाईक

वॉर्ड ९ विसेंट पॉल  र्नांडिस

वॉर्ड १० शांताराम कोलवेकर

वॉर्ड ११ राधिका नाईक

वॉर्ड १२ शिवानंद सावंत

वॉर्ड १३ विद्या पुनाळकर

वॉर्ड १४ निधी मामलेकर

साखळी – फोंड्यासंबंधी आश्‍वासने पूर्ण करणार : पर्रीकर

साखळी व फोंडा येथे झालेल्या पालिका मंडळाच्या निवडणुकीत भाजप-मगो युतीला भरघोष यश मिळवून दिल्याबद्दल जनतेचे आपण अभिनंदन करीत असल्याचे सांगून त्यांना दिलेल्या सर्व आश्‍वासनाची सरकार पूर्तता करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

१४ महिन्यांपूर्वी जनतेने जो भाजपवर विश्‍वास दाखविला होता तो मतदारांनी अबाधित ठेवल्याचे ते म्हणाले. साखळी भागात मागच्या सरकारने नियोजन नसतानाच प्रकल्प उभारले होते. आपले सरकार नियोजनबद्ध पद्धतीने विकास करीत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.