साखळी नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उपेंद्र कर्पे, दामू घाडी, मनिषा पोकळे, नारायण रेलेकर, धर्मेश सगलानी या नगरसेवकांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी धमेरी सगलानी, रोहिदास रेलेकर, दयानंद बोर्येकर यानी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले. आज सकाळी ११ वा. ही निवड प्रक्रिया होणार आहे.