Home बातम्या साखळीत १७ लाखांचे मोबाईल चोरीला

साखळीत १७ लाखांचे मोबाईल चोरीला

0

साखळी गोकुळवाडी येथील लाडजी टॉवर्समधील रामदेव इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञातांनी सुमारे १७ लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. भर वस्तीत हा प्रकार घडल्याने पोलीसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

उदयसिंग यांच्या मालकीच्या या दुकानात त्यांनी मोबाईल्स मोठ्याप्रमाणात स्टॉक करून ठेवले होते. काल रात्री १०.३० वा. दुकान बंद केल्यानंतर शटरचे रिप तोडून शटर वाकवून ३५० मोबाईल्स चोरून नेले. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. श्‍वानपथक व ठसे तज्ञास पाचारण केले परंतु धागेदोरे सापडले नाहीत. आमदार प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली व गजबजलेल्या जागेत चोरी घडल्याने चिंता व्यक्त करून जादा पोलीस कुमक तसेच रात्रीचा पहारा व साखळीत पोलीस ठाण्याचा दर्जा वाढवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

पोलीस कर्मचार्‍यांची संख्या कमी असून ती वाढवण्याची गरज आहे तसेच या परिसरात सतर्क राहण्याची गरज त्यानी व्यक्त केली. पोलिसांनी पंचनामा केला असून तपास चालू असल्याचे निनाद देऊलकर यांनी सांगितले.

कुंडईत लाखभराचे मोबाईल चोरीस

कुंडई येथे औद्योगिक वसाहत परिसरात असलेले दुकान काल दि. ८ रोजी रात्री चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून जवळ जवळ १ लाख रुपये किंमतीचे मोबाईल्स चोरीला गेल्याची तक्रार दुकानमालक राजकुमार दीनदयाळ तृपाल यांनी फोंडा पोलिसात नोंदवली आहे.

फोंडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजू कवळेकर यांनी सहकार्‍यासह जाऊन घटनेचा पंचनामा केला. श्‍वानपथक, ठसे तज्ज्ञ आणून तपास करण्यात आला पण रात्रीपर्यंत कोणीही सापडला नाही. तपासकाम तेच करत आहेत.