साकवाळ सरपंचांना लाच घेताना अटक

0
137

भ्रष्टाचारविरोधी पोलिसांनी काल साकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांना लाच घेण्याच्या प्रकरणी रंगेहाथ अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. श्री. बोरकर यांनी घराच्या बांधकामास ना हरकत दाखला देण्यासाठी संबंधितांकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. भ्रष्टाचारविरोधी पोलिसांनी वरीलप्रकरणी सापळा रचून बोरकर यांना अटक केली व त्याच्याकडून ७५ हजार रुपये जप्त केले. आज त्याला रिमांडसाठी न्यायालयासमोर उभे करणार असल्याची माहिती बास्को जॉर्ज यांनी दिली.