सांताक्रुझ येथे झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपी नॉर्मन फर्नांडिस याला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला आहे. नॉर्मन हा जखमी असल्याने गोमेकॉत उपचार घेत होता. त्यामुळे पोलिसांना त्याला अटक करता आली नव्हती.
दरम्यान, नॉर्मन फर्नांडिस याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेला त्याचा भावोजी ऍडगर वाझ याला जबानीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.