Home बातम्या सांग्याचे माजी आमदार प्रभाकर गावकरांचे निधन

सांग्याचे माजी आमदार प्रभाकर गावकरांचे निधन

0

सांगे मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार प्रभाकर गावकर यांचे काल दुपारी वयाच्या ४८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. शिरोडा येथील आयुर्वेदिक महाविद्यालय इस्पितळात ते दाखल झाले होते.

राज्यपाल भारतवीर वांचू, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आदींना गावकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गावकर यांनी साळावली धरणग्रस्त, साखर कारखाना कामगार व अन्य अनेक विषयांवर महत्वाची भूमिका बजावल्याचे पर्रीकर यांनी शोक संदेशात म्हटले आहे. भारतीय जनता पक्षानेही त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. स्व. गावकर हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने धक्का बसल्याचे भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी म्हटले आहे. गावकर यांच्यावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री रमेश तवडकर, आमदार गणेश गावकर व सुभाष फळदेसाई, माजी आमदार वासुदेव गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.