सांगें नगरपालिकेने जमीन संपादन न करताच दांडो ते मिरॅकल्स हायस्कूल या दरम्यान महामार्ग ६ वर बेकायदेशीररित्या पदपथ उभारण्याचे काम हाती घेतले असल्याचा आरोप काल ‘ह्युमन राईट्स डिफेर्न्डस’ या बिगर सरकारी संघटनेने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
जेथे पदपथ बांधण्यात येत आहे ती जागा महामार्ग ६च्या रुंदीकरणासाठी राखून ठेवण्यात आलेली असून असे असताना बेकायदेशीररित्या तेथे पदपथ बांधण्यासाठी जो ५ कोटी ५७ लाख ५२ हजार रु. एवढा खर्च केला जात आहे तो पाण्यात जाण्याची भीती वरील संघटनेचे अध्यक्ष ऍडविन फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.