सहारनपूर दंगलीत  ३ मृत्युमुखी

0
133

केंद्राकडून सुरक्षा दलाची पाठवणी
जमिनीच्या वादावरून दोन समूहांत उसळलेल्या दंगलीत तीन जण मृत्युमुखी पडले तर पोलिस व अन्य मिळून १९ जखमी झाले. मोठ्या प्रमाणात भिडलेल्या जमावाने एकमेकांवर विटांचा माराही केला. पोलिसांना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी रबरी गोळ्यांचा मारा करावा लागला. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांना जमावबंदी आदेश लागू करावा लागला. दरम्यान, एका पोलिसास गोळी लागून तो जखमी झाला आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून उत्तर प्रदेश पोलिसांची ज्यादा कुमक सहारनपुर येथे पाठविण्यात आली आहे. केंद्रानेही निमलष्करी दलाचे ६०० जवान पाठविले आहेत. काल पहाटे एका गटाने एका जागेवर बांधकाम सुरू केल्यानंतर दुसर्‍या गटातील लोकांनी त्याला आक्षेप घेतला व त्यानंतर वातावरण चिघळले. सहारनपुर हे ठिकाणी दिल्लीपासून १७० कि.मी. अंतरावर आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधून शांती व सुव्यवस्थेविषयी चर्चा केली.