सहवैमानिकाने दिली विमान अपहरणाची कबुली

0
14

कॅप्टन स्मित मच्छारवर हल्ला केल्याचेही केले मान्य

विमान क्रॅश करण्याचा होता प्रयत्न

‘फ्लायदुबई’ विमान प्रकरण

सहवैमानिक हमाम अल-हमामी याने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर केलेल्या हल्ल्याची आणि विमान अपहरणाच्या प्रयत्नांची कबुली दिली आहे. एवढेच नाही तर, विमान हायजॅक करून सर्व प्रवाशांसह ते क्रॅश करण्याचा माझा कट होता. मला मरणाची भीती वाटत नाही, असेही हमाम अल-हमामी याने सौदी तपास अधिकाऱ्यांसमोर म्हटले आहे. दुबईहून तेल अवीवला अर्थात इस्रायलला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानातील भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करून विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करणारा सहवैमानिक हमाम अल-हमामी याने तपास अधिकाऱ्यांसमोर ही कबुली दिली.

हमाम अल-हमामीने चौकशीदरम्यान आपले भयंकर इरादे उघडपणे स्पष्ट केले आहेत. यावेळी हमामी याने विमान जाणूनबुजून पाडण्याचा आपला हेतू होता. त्यात आपला मृत्यू होणार होता हेही आपल्याला माहीत होते परंतु आपल्याला मृत्यूची भीती वाटत नसल्याचे त्याने सांगितले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फ्लायदुबई एअरलाइन्सचे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी 6 मिनिटे फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी, तुम्ही भारत आणि इस्रायलच्या लोकांचे खरे हिरो आहात. तुम्ही संपूर्ण जगाचे हिरो आहात असे सांगून पुढील स्वातंत्र्यदिनी उत्सवाची मशाल पेटवण्यासाठी मी तुम्हाला आणि माझे मित्र पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित करू इच्छित असल्याचे सांगितले.
आरोपीला सोडणार नाही
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यासंदर्भात बोलातना आरोपी मच्छार याला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे म्हटले आहे. तसेच, कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्याशी बोलताना, बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांना आगामी स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलला येण्याचे आमंत्रणही दिले आहे. हमामी हा प्रामुख्याने ओमानचा नागरिक आहे. त्याचे वडील ओमानचे, तर आई सीरियन असल्याचे म्हटले जाते. तो अत्यंत जहाल आणि कट्टरपंथी विचारांचा असल्याचे बोलले जात आहे. तो पूर्वी ‘ओमान एअर’मध्ये नोकरी करत होता. मात्र त्याच्या जिहादी आणि कट्टरपंथी विचारांमुळे तेथून हाकलून देण्यात आले होते.

नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित यांना विमानात नेमके काय झाले होते याची विचारणा केली असता, स्मित यांनी हल्ल्यापूर्वी सहवैमानिकाने प्रार्थना करण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रार्थनेनंतर काही मिनिटांनी त्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती दिली.

हमामी ओमानचा रहिवासी
हमाम अल-हमामी हा ओमानचा रहिवासी असून तो अल अरेबिया इंग्लिशनुसार, तो बराच काळ सीरियात राहिला होता. तिथे त्याच्यावर कट्टरपंथी विचारसरणीचा प्रभाव पडल्याचे समोर आले. इस्रायलच्या चॅनेल 12 च्या वृत्तानुसार, तो अल-कायदाच्या विचारसरणीने प्रभावित असल्याचा दावा केला आहे. 2024 मध्ये त्याला ओमानच्या राष्ट्रीय विमान कंपनीतील वैमानिक प्रशिक्षणातून हटवण्यात आले होते. तो कट्टरपंथी इस्लामिक संकेतस्थळे पाहत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला विमान कंपनीत दुसरी जबाबदारी देण्यात आली.

नेतन्याहूंनी साधला
कॅ. मच्छारशी संवाद

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फ्लायदुबई एअरलाइन्सचे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी 6 मिनिटे फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी, तुम्ही भारत आणि इस्रायलच्या लोकांचे खरे हिरो आहात. तुम्ही संपूर्ण जगाचे हिरो आहात असे सांगून पुढील स्वातंत्र्यदिनी उत्सवाची मशाल पेटवण्यासाठी मी तुम्हाला आणि माझे मित्र पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित करू इच्छित असल्याचे सांगितले.

कुऱ्हाडीचा हल्ल्यासाठी वापर

सहवैमानिक हमामी याने आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवलेल्या कुऱ्हाडीचा शस्त्र म्हणून केला वापर केला. या कुऱ्हाडीने त्याने भारतीय पायलट कॅप्टन स्मित माच्छर यांच्यावर हल्ला केला होता. यापूर्वी विमानातील प्रवाशांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाकूने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले होते. विमानात आपत्कालीन परिस्थितीसाठी एक खास कुऱ्हाड ठेवली जाते. जिला ‘क्रॅश क्स’ म्हणतात. आग लागल्यास एखादा पॅनेल कापून आत पोहोचण्यासाठी, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा मार्ग तयार करण्यासाठी किंवा गरज भासल्यास विमानाचा एखादा भाग कापण्यासाठी अथवा उघडण्यासाठी तिचा वापर केला जातो.