सलग दुसर्‍या दिवशी दीडशे कोरोना रुग्ण

0
8

राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच असून, सलग दुसर्‍या दिवशी दीडशेहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद काल झाली. मागील चोवीस तासांत नवीन १५१ कोरोनाबाधित आढळून आले असून, २ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येने नऊशेचा टप्पा ओलांडला असून, सध्या ९०५ एवढी झाली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १२.३४ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत नवीन १२२३ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, त्यात १५१ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३३ एवढी आहे. चोवीस तासांत नवीन २ रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी दुसर्‍या बाजूने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. चोवीस तासांत आणखी ११२ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०९ टक्के एवढे आहे.