सर्व सरकारी इस्पितळांत दीनदयाळ कार्ड सक्तीचे

0
5

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि राज्यातील सर्व सरकारी इस्पितळे, तसेच आरोग्य केंद्रांत आरोग्य सेवेसाठी रुग्णांना दीनदयाळ सामाजिक सुरक्षा योजना कार्ड हे आता सक्तीचे असेल, असे काल सरकारने स्पष्ट केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दीनदयाळ सामाजिक सुरक्षा योजना, गृहआधार, लाडली लक्ष्मी तसेच अनुसूचित जमातींसाठीच्या सर्व योजना यांचा आढावा घेतला.

दीनदयाळ सामाजिक सुरक्षा योजना कार्डांचे लोकांना विनाविलंब नूतनीकरण करता यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला आपली सर्व केंद्रे 365 दिवस खुली ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दीनदयाळ सामाजिक सुरक्षा योजनेखाली पडून असलेले सगळे अर्ज पुढील महिन्यापर्यंत हातावेगळे करण्यात यावेत, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित खात्याला दिला.

दीनदयाळ सामाजिक योजनेखालील सर्व इस्पितळांची बिले दर महिन्याला हातावेगळी करता यावीत, यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाला आवश्यक ती पावले उचलण्याचा आदेश देण्यात आला आहे.