या नियमाचे उल्लंघन झाल्यास वाहकांना चलन देण्याची तरतूदही कायद्यात असून राखीव आसनाच्या बाबतीत जनतेनेही जागृत रहावे, असे आवाहन संचालकांनी केले आहे.
बसमधील चार जागा महिलांसाठी राखीव असतानाही पुरुष प्रवासी या आसनावरच बसतात व वाहकही संबंधित प्रवाशांना सूचना देण्याचे टाळतात. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विकलांग यांना आसने राखीव ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आल्यानेच वरील आदेश जारी केला आहे. सरकारने महिलांसाठी आठ आसने राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची लवकरच अधिसूचना जारी होईल, असे देसाई यांनी सांगितले.
वाहन चालक, वाहक यांच्या वर्तनावरही कक्ष ठेवण्यास अधिकार्यांना सांगितले आहे. वर्षभरापूर्वी कालवी येथे बसचे ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातात विद्यार्थी बळी गेले होते. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून टायर व ब्रेकची तपासणी करण्यास सांगितल्याचे देसाई म्हणाले.

