एकदा ही आवश्यक ती साधनसुविधा उभारली की राज्यातील एकाही प्राथमिक शाळेचे वर्ग संध्याकाळी भरवण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने शाळांचे वर्ग अर्ध्या तासाने वाढवल्याने ज्या शाळांचे वर्ग संध्याकाळी भरतात त्या शाळांसमोर पेच निर्माण झालेला आहे.
अर्ध्या तासाने शाळेचा वेळ वाढवायचा झाल्यास शाळा ६.३० वाजता सोडावी लागेल. पण तसे केल्यास शाळेतील लहान मुलांना अंधारातून घरी जावे लागणार असल्याने व दूरहून येणार्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने तुर्त शाळा ६ वाजताच सोडण्याचा सल्ला शिक्षण खात्यातील अधिकार्यांनी शाळांना दिलेला आहे.
शाळा उशिरा सोडून लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्याची शिक्षण खात्याची तयारी नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. सर्व शाळांचे वर्ग सकाळी घेणे हा त्यावर एक तोडगा होऊ शकेल, असे ते म्हणाले.