Home बातम्या सर्व पेट्रोलपंपांची आजपासून तपासणी

सर्व पेट्रोलपंपांची आजपासून तपासणी

0

पेट्रोल ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आजपासून सर्व पेट्रोलपंपांची तपासणी सुरू करणार असल्याचे सांगून विक्रेत्यांच्या मालमत्तेचीही संबंधित यंत्रणेद्वारे तपासणी करण्यास आपण भ्रष्टाचारविरोधी पोलिसांना सांगितल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत बेंजामीन सिल्वा यांच्या प्रश्‍नावर सांगितले.

येथील पेट्रोल वाहनात भरून किंवा कॅनमधून महाराष्ट्र राज्यात नेऊन विकल्यास गोव्याला आर्थिक नुकसान होत नाही. महाराष्ट्र सरकारचेच नुकसान होते, असे पर्रीकर यांनी एका संबंधित प्रश्‍नावर सांगितले. मर्यादेपेक्षा अधिक इंधनाची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी वजन माप खात्याकडे अधिकार नाहीत, त्यामुळे त्यावर अधिक माहिती देऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.