सर्वांशी गुण्यागोविंदाने नांदणारे राजेंद्रभाई

0
99
  • श्रीमती श्यामल अवधूत कामत
    (मडगाव-गोवा)

वाडेनगर शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष मा. राजेंद्र विश्‍वनाथ आर्लेकर यांची निवड राज्यपालपदी झाली व दि. १३ जुलै २०२१ रोजी मोठ्या उत्साहात शपथविधी पार पडला. ही तर या संघटनेच्या अंतर्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे.

मी गेल्या जुलैमध्ये याच संघटनेच्या आशीर्वादाने चालत असलेल्या वाडेनगर इंग्लिश हायस्कूलमधून जुलै २०२० मध्ये स्वेच्छा निवृत्त झाले आणि यंदाच्या जुलैमध्ये भाईंनी हिमाचल प्रदेशमध्ये राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली. हा सोहळा बघताना मी ३८ वर्षे मागे गेले. १९८३ च्या जून महिन्यात मी बीएससी परीक्षा अजून निकाल यायचा होता, त्याही परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आशीर्वादाने आणि राजेंद्र भाईंच्या सांगण्यावरून त्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाले. प्रवास खूप होता. पणजी ते वास्को त्यात नवेवाडे जिथे शिपयार्ड वरून प्रवासाची व्यवस्था नाही. चालत जाणं तसं तर खूप कठीण वाटत होतं, परंतु कुणास ठाऊक ज्यादिवशी मी त्याठिकाणी रुजू झाले त्या दिवसापासून त्या छोट्याशा वास्तूच्या आणि त्या शाळेच्या प्रेमात मी पडले, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्यावेळेला मला या शाळेत मुलाखतीसाठी घेऊन जाणारे होते आजचे संघटन मंत्री सतीशजी धोंड आणि माजी मुलाखत घेतली होती राजेंद्रभाईंनी. तब्बल ३८ वर्षे या सगळ्याचा सहवास मला लाभला. मध्यंतरी अनेकवेळा दुसरीकडे शिक्षिका म्हणून जाण्याची संधी मला आली होती. परंतु येथील जाणकार मंडळ दुसरीकडे कुठेही सापडणार नाही. अजूनही काही मंडळी आहे. ज्यांनी जिवापाड प्रेम केले त्या म्हणजे कै. मॉं (भाईर्ंच्या मातोश्री) ज्यांनी जिवापाड प्रेम केले. राजेंद्रभाईंच्या वागण्यात, बोलण्यात पदोपदी कै. मॉ यांचा भास होत असतोच.
हायस्कूलमध्ये रुजू झाल्यावर भाईंची काम करण्याची पद्धत मला बघायला मिळाली ती म्हणजे वास्को शहराचे वास्को द गामा हे नाव बदलून संभाजीनगर करा हा नारा घेऊन कितीतरी हजार पत्रके त्यावेळेला त्यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी वाटली गेली. त्यांचं तडफदार नेतृत्व आम्ही सर्वांनी त्यावेळेला अनुभवले. जशी त्यांच्यावरची जबाबदारी वाढत गेली, तसे त्यांचे शाळेत येणे कमी होऊ लागले. परंतु जेव्हा जेव्हा आले आणि त्यांनी मिटिंग घेतली तेव्हा आम्हा शिक्षकांना दहावीचा निकाल कधीच विचारला नाही, उलट असंच सांगितले की, ९वीतून मुले दहावीत पाठवा. पुढे निकाल चांगला यायला हवा, म्हणून त्यांना मागे ठेवू नका. नववीच्या सर्टिफिकेटवर किंवा दहावी नापास सर्टिफिकेटवर कदाचित त्यांना कुठेतरी कोर्स करता येईल. समाजात उभे राहतील, काहीतरी कमावतील हे खास नमूद करावं असेच वाटले. कारण अधिकतम शाळा दहावीचा निकाल १००% लागावा म्हणून खूप शाळा नववीचा निकाल फक्त ५०% लावतात. तसं बिघतलं तर या सगळ्या शाळांकडे सदन कुटुंबातील मुले येतात. परंतु आमचे अध्यक्ष मात्र माणूस घडवण्याचं काम करत असतात. अनेक सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या आशीर्वादाने एखादी शिक्षण संस्था चालत असेल, तर त्या पालकांना आपल्या पार्टीच्या कामासाठी वापरतात किंवा त्या शाळेतील मुलांना मोर्चात उपस्थिती वाढवण्यासाठी घेऊन जातात, परंतु ३८ वर्षाच्या काळात मला एकही कार्यक्रम आठवत नाही ज्या ठिकाणी भाईंनी या संस्थेच्या शिक्षकांना किंवा पालकांना वेठीस धरून पार्टीचे केले असावे. त्यामुळे भाईंच्या अध्यक्षतेखाली काम केल्याचा मला खूप खूप अभिमान वाटतो.

भाईंबरोबरचे अनेक प्रसंग अजूनही आठवणीत आहेत. १९८९ साली भाजपची नवी कार्यकारिणी स्थापन झाली त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष आजचे केंद्रीय बंदर, जहाजउद्योग, जलवाहतूक व पर्यटनमंत्री मा. श्रीपाद नाईक होते. तसेच जनरल सेक्रेटरी बहुधा राजेंद्रभाई असावे व महिला मोर्चा प्रमुख मी स्वत: होते. कारण कमी तिथेे आम्ही. कोणीच नसेल तर मला. अशीच माजी कायम भूमिका असायची. बहुधा त्या वेळेला कोणीच नसावे म्हणून मी. हळूहळू काम वाढले. रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाले. त्याच दरम्यान त्याकाळचे प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग गोव्यात यायचे होते. त्यांचा कार्यक्रम मडगाव येथे आदर्श हॉलमध्ये आयोजित केला होता. त्याचं दिवशी दुपारच्या वेळेस राजेंद्रभाई आणि सतीश धोंड घरी आले. सगळ्यांची जेवणं झाली. बोलता बोलता दोघांनीही एक जबाबदारी माजावर सोपवली. दोघेही मला आदशर्र् हॉलवर घेऊन गेले. प्रधानमंत्री म्हटल्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होताच. मी पंतप्रधानांसमोर गेले आणि माझ्या पर्समधून आणलेल्या चार डझन बांगड्यांचा गुच्छ काढला. त्यांनी अजाणतेपणी तो हातात घेतला. सभोवताली अनेक कार्यकर्ते होते. सगळे ओरडले. ीराश, ीराश एका सेकंदाच्या अवकाशात भाईंनी मला मागे फेकले. मी पळत पळत घरी आले आणि भाई व सतीश यांना अटक करण्यात आली. पोलीसही त्याक्षणी अवाक झाले असावे. रात्रीचे बारा वाजेपर्यंत अवधूत आणि मी आम्ही दोघेही ह्यांची वाट बघत बसलो होतो. जेव्हा हे घरी आले तेव्हा भाईंचा शर्ट फाटला होता आणि तो रक्तानेही माखला होता. बहुदा तेव्हा ह्यांनी मार खाल्ला असावा, अस भाईच कधीतरी आठवणी काढताना बोलून गेले. हा प्रसंग आठवला आणि योग्य माणसाची राज्यपालपदी निवड झाल्याचा अभिमानही वाटला.

काही वर्षांनी प्रमोशनवर मी हेड मिस्ट्रेस झाले, तेव्हा भाई संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली माझ्याकडून चुकाही झाल्या असतील तरी त्यांनी प्रत्येकाला सांभाळले, कधीच ओरडले नाही. शिपायापासून अधिकार्‍यांपर्यंत अगदी गुण्यागोविंदाने नांदणारे भाई आज राज्यपाल झाले याचा मला खूप अभिमान वाटतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तपश्‍चर्या, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, मित्रपरिवाराचे सहकार्य त्यांना सदोदित लाभणार यात शंकाच नाही. सौ. अनघा, सौ. अदिती व त्यांचे कुटुंबीय तसेच अमोघ या सगळ्यांच खूप खूप अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.