सर्वांदेखत चोरट्यांनी १९४ ‘फायर डिटेक्टर’ पळवले

0
60

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. १ रोजी अज्ञात दोन चोरट्यांनी कंपनीतून देखभालीच्या कामासाठी पाठविल्याचे तेथील संबंधित अधिकार्‍यांना सांगितले व दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी मजुरांना घेऊन ते प्रकल्पात आले. देखभाल करीत असल्याचे भासवून त्यांनी वरील वस्तू पळविल्या. तोपर्यंत हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही.

बुधवारी संबंधित कंपनीचा प्रतिनिधी तेथे आला असता, कंपनीने कुणालाही देखभालीसाठी पाठविले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच चोरीचा प्रकार उघडकीस आला. ग्रंथालयाच्या अधिकार्‍यांनी काल या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात अज्ञात चोरट्यांची छायाचित्रे टिपली आहेत. त्यामुळे चोरट्यांना लवकर गजांआड करणे शक्य होईल, असे वाटते.

चोरीची कार्यपद्धत लक्षात घेतल्यास त्यांना प्रकल्पातील प्रत्येक स्थळाची माहिती होती, असे दिसते. हा प्रकल्प मोठा असल्याने अधूनमधून वेगवेगळ्या उपकरणांच्या देखभालीसाठी तंत्रज्ञ येत असतात. त्यामुळे तेथील कर्मचार्‍यांनाही संशय येऊ शकला नाही.