Home बातम्या सराफी दुकानातून सोनसाखळी चोरली

सराफी दुकानातून सोनसाखळी चोरली

0

डिझायनर्स ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानातून दोन अज्ञात महिलांनी सोने खरेदी करण्याच्या बहाणा वरून सत्तर हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन (१६ ग्रॅम) लंपास केली.

काल बाजाराच्या दिवशी दुपारी २ महिला सदर दुकानात आला व चेन दाखवण्याची विनंती केली याच दरम्यान दुसर्‍या महिलेने गोष्टी करत असताना एक चेन बॅगेत टाकली व थोड्या वेळाने दोघेही दुकानातून निघून गेल्या.

त्यानंतर दुकान मालक बाळकृष्ण वेर्णेकर यांनी चेन बॉक्स ठेवताना एक चेन गायब झाल्याने लक्षात येताच डिचोली पोलीसात तक्रार नोंदवली. याप्रकरणी डिचोली पोलीसांनी गुन्हा नोंदवला असून शोध जारी आहे.