Home बातम्या सरकार पाडण्याच्या अफवा पसरविणे पध्दतशीरपणे चालू

सरकार पाडण्याच्या अफवा पसरविणे पध्दतशीरपणे चालू

0

आपल्याला कोणीही विकत घेऊ शकणार नाही. कोणत्याही प्रश्‍नावर मतभेद असू शकेल, त्याचप्रमाणे आपण कुणालाही भेटू शकतो. याचा अर्थ सरकार पाडण्यासाठी भेटलो असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या विश्‍वासाचा आपण घात करणार नसल्याचे ते म्हणाले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत सरकार पाडण्याची कुणी कल्पनाही करू नये. तसेच सर्व आमदार संघटित असल्याचे वाघ यांनी सांगितले. सरकारच्या स्थैर्याबाबत संभ्रम निर्माण करणार्‍या बातम्या प्रसिध्द झाल्याने त्या अनुषंगाने आपण सर्व म्हणजे एकविसही आमदारांकडे चर्चा केली असता त्यात काहीही तथ्य नसल्याचे दिसून आले, असे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांचा विदेशातील दौरा वैयक्तिक स्वरुपाचा आहे. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा कुठे आहेत याची आपल्याला कल्पना नाही, असे प्रवक्ते वाघ यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.