राज्य सरकारची सेवा आणखी सक्षम करण्यासाठी डेटा केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली. माहिती-तंत्रज्ञान खात्याने बांबोळी येथे आयोजित मार्केट एक्सेस एस्क्पोचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
राज्य सरकारने आत्तापर्यंत 147 स्टार्टअपना सुमारे 3.92 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. गोवा हे प्रतिभा, स्टार्टअप आणि नवोन्मेष कल्पनांचे राष्ट्रीय केंद्र बनत आहे. गोवा राज्य आता नवोन्मेषाच्या नकाशावर झळकत आहे. भारत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, आपण शाश्वत डिजिटल प्रगती आणि नवोन्मेषाद्वारे आपली भूमिका बजावत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी माहिती-तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे व इतरांची उपस्थिती होती.