सरकारने माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विस्तार करावा

0
131

माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांचे साकडे
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मनुष्य बळाचा गोव्यातच वापर झाल्यास ब्रेन ड्रेनवर नियंत्रण येऊ शकेल त्यामुळे सरकारने गोव्यात माहिती तंत्रज्ञान उद्योग स्थापन करून त्याचा विस्तार करावा, अशी मागणी करणारे निवेदन या क्षेत्रातील व्यावसायिकांनी सरकारला सादर केले आहे. गोव्यात संधी नसल्याने येथील युवकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते. इच्छा आहे म्हणून लोक बाहेर जाणे पसंत करीत नसतात. रोजगारासाठी जावे लागते. हा उद्योग पर्यावरणावरही वाईट परिणाम करणार नाही. या क्षेत्रात काम करणारी जीआयटीपी संघटना सरकारला याबाबतीत पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे गुरुदेव नाईक व व्हिन्सेन तोस्कानो यांनी निवदेनात स्पष्ट केले आहे. गोव्याचा विकास योग्य दिशेने झाला पाहिजे. येथील युवक येथून बाहेर जात असल्याने गोव्याच्या अस्मितेलाही धोका पोचण्याची स्थिती निर्माण होत आहे.