Home बातम्या सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ पणजी व मडगावात निदर्शने

सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ पणजी व मडगावात निदर्शने

0

सरकारच्या लोकविरोधी व कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ काल गोवा कामगार महासंघाने पणजी व मडगाव शहरात निदर्शने केली.

उत्तर गोव्यात पणजीतील कदंब बसस्थानकावरून मोर्चा काढण्यात आला. नंतर कस्टम हाऊससमोर एक जाहीर सभा घेण्यात आली. गोवा कामगार महासंघाचे निमंत्रक ऍड. सुहास नाईक यांचे यावेळी भाषण झाले. जतीन नाईक, आनंद गावडे, गणेश कुबल, गणेश नाईक, केशव प्रभू, सातुरनिनो मिस्किता आदी कामगार नेते यावेळी हजर होते.

कामगारांना किमान १० हजार रु. वेतन देणे, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करणे, महागाई नियंत्रणात आणणे या प्रमुख मागण्यांसह सर्व मागण्या मान्य करणे यासाठी काल देशव्यापी निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.

मडगाव येथे कदंब बस स्थानकावरून मोर्चा सुरू झाला. नंतर लोहिया मैदानावर सभा झाली. कामगार नेते राजू मंगेशकर यांचे यावेळी भाषण झाले. कामगार नेते प्रसन्न उटगी, प्रताप म्हार्दोळकर, . एफ. जी. मास्कारेन्हस आदी यावेळी हजर होते.