गोमंतक मराठी अकादमीचे अनुदान रोखण्याच्या सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा विचार अकादमीने चालवला असल्याचे वृत्त असून यासंदर्भात अकादमीचे अध्यक्ष श्री. नरेंद्र आजगावकर यांना विचारले असता, सरकारची अकादमी संदर्भातील भूमिका जाहीर झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. सरकारने अनुदान थांबविल्याने अकादमीचे कार्यक्रम ठप्प झाल्याचा दावा त्यांनी केला.
आमदार विष्णू सूर्या वाघ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीला अहवाल सादर करण्यासाठी सरकारने चार फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. वरील अहवाल आल्यानंतरच त्यासंदर्भात अकादमी योग्य तो निर्णय घेईल असे श्री. आजगावकर म्हणाले. सरकारने अकादमीला अनुदान बंद करण्यासंबंधी काहीही कळविलेले नाही, असे ते म्हणाले.

