सरकारकडून खनिजाचा 9 मेपासून ई लिलाव

0
16

राज्य सरकारच्या खाण संचालनालयाने राज्यातील विविध ठिकाणी साठवून ठेवलेल्या लोहखनिजाचा 28 वा ई लिलाव जाहीर केला आहे. राज्यातील जेटी, खाणपट्टा किंवा भूखंडांवर साठवून ठेवलेल्या लोहखनिजाचा लिलाव येत्या 9 मेपासून केला जाणार आहे.
खनिजाच्या 28 व्या ई लिलावाची सविस्तर माहिती वेबसाइटवर जाहीर केली आहे. खनिज ई लिलाव निविदा प्रक्रिया एसएसटीसीच्या ई लिलाव पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. ई लिलाव प्रक्रिया, मूळ लिलाव किंमत यासह अनेक तपशिलासह वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या 2 मेपर्यंत ई लिलावासाठी उपलब्ध असलेल्या खनिजाची पाहणी व नमुने घेतलेे जाऊ शकतात. त्यानंतर 9 ते 11 मे दरम्यान ई लिलाव घेतला जाणार आहे. लाखो टन खनिजाचा ई लिलाव यावेळी केला जाणार आहे.