वरांगन-तेलंगणा येथील शिवा खंडोला (२८) या तरुणाला काल सकाळी बायणा समुद्र किनारी बुडून मरण आले. मयत शिवा खंडोला आपल्या पाच मित्रांसोबत काल सकाळी कोलवा येथून एका बोटीतून बायणा समुद्र किनार्यापर्यंत आला असता, मयत शिवाने बोटीतून पाण्यात उडी घेतली. तो पोहत किनारा गाठेल अशी अपेक्षा त्याच्या साथीदारांनी व्यक्त करून ते किनार्यावर पोचले. पण १०-१५ मिनिटानंतर त्याचा मृतदेह समुद्रात तरंगताना त्याच्या मित्रांना दिसला. त्यांनी लागलीच किनार्यावरील दृष्टीच्या जीवरक्षकांना याची कल्पना दिल्यावर, त्यांनी पाण्यातून मृतदेह किनार्यावर आणला. याप्रकरणी वास्को पोलिसांना खबर मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठविला. याप्रकरणी उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस अधिक तपास करीत आहेत.

