हेडलॅण्ड-सडा येथील सरकारी शाळेजवळ राहणार्या श्रुतिका भाऊ गावडे (२४) नावाच्या तरुणीने जापनीस गार्डन जवळील समुद्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.
सदर घटना दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. गावडे ही तरुणी सडा येथील कॉलनीमध्ये असलेल्या खासगी आस्थापनात नोकरीला होती. तेथून जवळच असलेल्या समुद्रातील खडकावर जाऊन पाण्यात उडी घेऊन तिने आत्महत्या केली. मुरगाव पोलिसांनी पंचनामा करून शवचिकीत्सेसाठी हॉस्पिसिओ मडगाव येथे पाठवून दिला आहे. आत्महत्येमागील निश्चित कारण समजू शकले नाही.