समीर मापारी खूनप्रकरणीउच्च न्यायालयात आव्हान

0
39

समीर मापारी खून प्रकरणात तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मडगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्टा यांनी दिलेल्या निवाड्याला जनतेचे हित लक्षात घेऊन उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी काल येथे स्पष्ट केले आहे.

या खटल्यातील आरोपींची मुक्तता करत असताना कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यात आली आहे की नाही याची शहानिशा उच्च न्यायालयाने करणे निकडीचे असून न्यायाची चाके कायद्याला धरून पुढे सरकली आहेत की नाहीत याचीही पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत ऍड. रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केले आहे.