सभापती गावकर यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

0
12

केंद्रातील भाजप सरकारने राज्यातील अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी संसदेत कायदा संमत केल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे सभापती गणेश गावकर यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेऊन या राजकीय आरक्षणासाठी त्यांचे आभार मानले.

गोव्यातील नव्या विधानसभा इमारतीला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष सोहळ्याची माहिती सभापती गावकर यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली. या ऐतिहासिक अशा कार्यक्रमासाठी मोदी यानी सहकार्य व मार्गदर्शन करावे, अशी विनंतीही गावकर यानी यावेळी त्यांना केली.
यावेळी सभापती गावकर यांनी पंतप्रधानांना कुणबी शाल तसेच स्वत: काढलेले मोदी यांचे हुबेहूब पोट्रेटही भेट दिले.