‘सबका विश्‍वास’ महत्त्वाचा ः मोदी

0
146

>> भाजप संसदीय मंडळाची बैठक

दिल्लीत काल भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील हिंसाचाराबद्दल भाऊक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी दिल्ली हिंसाचाराचा थेट उल्लेख टाळला. मात्र ‘सबका साथ’ ‘सबका विकास’च्या सोबतच ‘सबका विश्वास’ हा महत्त्वाचा असल्याचे सांगत खासदारांना मार्गदर्शन केले. माझ्यासाठी पहिला देश आहे आणि त्यानंतर पक्ष आहे. देशात शांतता आणि एकता गरजेची असल्याचे मोदी म्हणाले. पहिले प्राधान्य देशाला आहे.

विकास करणे हा भाजपचा मंत्र आहे. यासाठी देशात शांतता, एकता आणि सद्भावना आवश्यक आहे. या संगळ्यांसोबतच देशाच्या विकासाला चालना द्यायची आहे, असे मोदी यांनी या संसदीय बैठकीत मंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले. हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील भागांमध्ये अजूनही पोलीस तैनात असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.