Home बातम्या सनाऊल्लाची प्रकृती अद्याप गंभीर

सनाऊल्लाची प्रकृती अद्याप गंभीर

0

जम्मू येथील तुरुंगात शुक्रवारी मारहाण झालेल्या पाकिस्तानी कैदी सनाऊल्ला हक याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. ५२ वर्षीय सनाऊल्ला याला त्याच तुरुंगातील विनोद कुमार या कैद्याने जबर मारहाण केल्यानंतर त्याला तातडीने चंदिगढ येथील पीजीआय इस्पितळात दाखल करण्यात आले.

विनोद कुमार याला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. भारतातील दहशतवादी कारवायांप्रकरणी कैदेत असलेल्या सनाऊल्ला याची या इस्पितळात पाकिस्तानी दुतावासाच्या अधिकार्‍यांनी काल भेट घेतली. सनाऊल्ला याची प्रकृती गंभीर असली तरी त्याला या इस्पितळातून हलविण्यात येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.