संसदेच्या नवीन इमारतीचे
उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे

0
2

राहुल गांधींची ट्विटरद्वारे मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मे रोजी 862 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. 18 मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींची भेट घेऊन त्यांना नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यावर आक्षेप घेत संसद इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे असे रविवारी म्हटले आहे. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यास काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही आक्षेप घेतला आहे विरोधी पक्षाने दि. 28 मे रोजी विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे, त्यामुळे त्या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणे हा देशाच्या संस्थापकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.