संरक्षण सौद्यात राजीव गांधींची ‘मध्यस्थी’?

0
63

नवा ‘विकिलिक्स’ वाद

भारताच्या एका संरक्षणविषयक सौद्यात एका स्विडीश कंपनीसाठी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी मध्यस्थ म्हणून वावरत होते, असा खुलासा नव्याने जारी ‘विकिलिक्स’ केबल्समध्ये करण्यात आला आहे. मात्र ही मध्यस्थी राजकारणा येण्यापूर्वीची, वैमानिक म्हणून काम करतानाची होती, असे म्हटले आहे.

या प्रकरणी भाजपने कॉंग्रेसकडून स्पष्टीकरण मागितले असून कॉंग्रेसने विकिलिक्सचे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे.

विकिलिक्समार्फत जारी झालेल्या १९७४ ते १९७६ दरम्यानच्या अमेरिकेच्या दूतावासातील केबल्सनुसार स्विडीश कंपनीने राजीव गांधींची मदत घेण्याचे ठरविले होते कारण भारतीय राजकारणात घराण्याच्या प्रभावाची त्यांना कल्पना होती. या काळात पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या.

दरम्यान, काही दिवसांनंतर पुन्हा पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, आतापर्यंत आम्हाला राजीव गांधी हे वैमानिक म्हणूनच माहित होते, मात्र आता त्यांची ओळख उद्योजक म्हणूनही झाली आहे. दरम्यान, त्या काळी हा विमान सौदा नंतर ब्रिटीश कंपनी जागुआरशी करण्यात आला होता.